Home कोल्हापूर जिल्हा संच मान्यता प्रक्रिया स्थगित करावी यासाठी शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांचे...

संच मान्यता प्रक्रिया स्थगित करावी यासाठी शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना शुक्रवारी निवेदन

Advertisements

संच मान्यता प्रक्रिया स्थगित करावी यासाठी शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना शुक्रवारी निवेदन

Advertisements

 

 

कोल्हापूर , (प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संच मान्यते बाबत पारीत केलेला शासन आदेश अन्याय कारक असून त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शाळा बंद पडतील. हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार असून अनेक शाळांना मुख्याध्यापक मिळणार नाहीत. सदरच्या आदेशास नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सदरच्या स्थगिती नुसार कोल्हापूर जिल्ह्यात चालू असलेली संच मान्यता त्वरीत स्थगित ठेवावी यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व जिल्हा मुख्याध्यापक संघ यांचे संयुक्त शिष्ट मंडळ शुक्रवार दि. ९ मे रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांना सकाळी ११ वा. लेखी निवेदन देण्याचा निर्णय आज विद्याभवन येथे घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार होते. व्यासपीठ अध्यक्ष एस.डी. लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सभा संपन्न झाली.

या सभेस शिक्षक नेते दादासाहेब लाड, बी. जी. बोराडे, सचिव आर. वाय. पाटील, अनिल लवेकर, भरत रसाळे,प्रा.सी एम. गायकवाड, सुधाकर निर्मळे, राजेश वरक ,इरफान अन्सारी ,श्रीकांत पाटील, संजय पाटील, उदय पाटील, एम. जे. पाटील, एस. के.पाटील, पंडीत पवार, शिवाजी भोसले, एच. वाय. शिंदे, हेमंत धनवडे, बाजीराव साळवी, मदन निकम आदीसह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Advertisements
Advertisements