विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांचा महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस संघटने वतीने सत्कार
कोल्हापूर, (प्रतिनिधी):- अपुऱ्या गाड्या,अपुरा कर्मचारी वर्ग व अपुरी यंत्र सामुग्री अशा परिस्थितीत कोल्हापूर विभागाचे विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांच्या नियोजनबद्ध प्रशासकीय कार्यपद्धतीमुळे कोल्हापूर विभागाने राज्यात दुसरा नंबर मिळविला त्याचप्रमाणे लिपिक बढती नेमणूक व विनंती बदली प्रतिनियुक्ती ही प्रक्रिया सकारात्मक पणे पार पाडीत कामगारांना न्याय दिल्याने आज महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेस या संघटनेच्या वतीने राज्य उपाध्यक्ष तथा विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर यांच्या हस्ते विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संजीव चिकुर्डेकर यांनी कामकाजाचा आढावा घेत विभाग नियंत्रक साहेबांचे कार्य कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली असता विभाग नियंत्रक यांनीदेखील सर्व अधिकारी,कर्मचारी यांनी सांघिक भावनेने केलेल्या कामाचे हे यश असल्याचे विदित केले. कामगार अधिकारी यांनीही मनोगत व्यक्त करीत सर्वांचे कौतुक केले.
या सत्कार सोहळ्या प्रसंगी कामगार अधिकारी संदीप भोसले,लेखाधिकारी मानिनी तेलवेकर,सुरक्षा अधिकारी भानुदास मदने, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी गीतांजली सूर्यवंशी, संघटनेचे अध्यक्ष सुनिल घोरपडे,उत्तम पाटील, संदीप पाटील, रविराज नलवडे,राजेंद्र पाटील प्रसादशिंदे,हबीब चाऊस,किरण पुजारी,विकास पोवार, जयवंत खद्रे,प्रकाश कुंभार, दिपाली येलबेली, प्रतिभा पाटील,वैशाली पिंगळे, वैशाली पाटील, नीता मोरे, संगीता बागडी,अंकिता राऊत,रतन सावंत,सोनाली कोळी,अश्विनी चौगुले, सानिका पाटील यांच्यासह बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.