Home कोल्हापूर जिल्हा टोपच्या कुस्ती मैदानात उदय खांडेकर ने एकचाक डावावर गंगावेश तालीमीच्या बाला साळुंखे...

टोपच्या कुस्ती मैदानात उदय खांडेकर ने एकचाक डावावर गंगावेश तालीमीच्या बाला साळुंखे केले चितपत

Advertisements

टोपच्या कुस्ती मैदानात उदय खांडेकर ने एकचाक डावावर गंगावेश तालीमीच्या बाला साळुंखे केले चितपत

Advertisements

 

 

 

टोप, (वार्ताहर):- मकानसाहेब पीर उरुसानिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत
कंदूर च्या उदय खांडेकर ने एकचाक डावावर गंगावेश तालीमीच्या बाला साळुंखे ला चितपत केले.दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्ती वारणेच्या नामदेव केसरे ने एकेरी पट काढत कवठेपिरान च्या सुनील करवते चितपट केले.
कुस्ती आखाडयाचे पूजन उदयोगपती धनाजी पाटील, सरपंच तानाजी पाटील,माजी सभापती डॉ.प्रदीप पाटील,पिलाजी पाटील नंदकुमार मिरजकर, प्रकाश पाटील, पैलवान गुंडाजी पाटील, श्रीपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
मैदानात महिलाच्याही कुस्त्या ही पार पडल्या या कुस्तीत पल्लवी जाधव (वाठार), देवयानी शिंदे, अमृता कुंभार (घुणकी) यांनी विजय संपादन केले. तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत वाटेगाव च्या अनिरुद्ध पोवार ने गंगावेश तालीमीच्या प्रथमेश घाटगे ला पोकळ घिसा डावावर विजय मिळविला.
विजयी पैलवानाची नावे पुढीलप्रमाणे
रुद्र पाटील (वळिवडे),दिग्विजय पाटील (कळबां), राजवीर कासोटे (अर्जुनवाडा), चिन्मय सिसाळ (टोप),राजवीर जाधव (वारणा), सोहम खाडे, वीर मुळीक (टोप), शौर्य माने,अथर्व जाधव,प्रेम जाधव(टोप),महेश पाटील संग्राम गोसावी(कांदे),विराज पाटील (कंदूर),सुदर्शन पाटील (राशिवडे),प्रज्वल पाटील (अर्जुनवाडा), अमोल निंबाळकर (वारणा),सुनील वरपे (कुरळप), रामा माने (वारणा) माणिक पुजारी (टोप)हुसेन पटेल (वारणा),पृथ्वीराज मोहिते (घुणकी)शंकर माने (पारगाव)अनिरुद्ध पोवार,तर टोप च्या प्रज्वल भोसले चटकदार कुस्ती करून सर्वाची मने जिकली.
(अनेक लहान मोठया चटकदार कुस्त्या झाल्या.गावातील जुन्या मल्लाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच रमेश पाटील,बाळासाहेब चव्हाण,माजी माणिक पाटील, विरधवल पाटील, बाळासो कोळी, उत्तम पाटील, सुनील काटकर, विश्वास कुरणे, दीपक पाटील,दिलीप मुळीक, बापू पोवार,विनोद पाटील, केरबा पाटील,बाजीराव पोवार, हिंदुराव मुळीक,आनंदराव साळुंखे,अमोल पाटील,लक्ष्मन पाटील,प्रकाश पाटील, सुनील परिट कृष्णात शिंदे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुस्तीचे पंच म्हणून श्रीरंग तावडे, आकाराम कुरणे, भैरवनाथ पाटील, आनंदराव पाटील, यशवंत चौगुले,पांडुरंग कांबळे, विजय पाटील, राजेंद्र वाघमारे यांनी काम पहिले.कुस्तीचे निवेदन ईश्वरा पाटील यांनी केले. कुस्ती मैदानाचे नेटके संयोजन यात्रा कमिटीने केले होते.आभार बाळासाहेब चव्हाण यांनी मानले.

Advertisements
Advertisements