अमरसिंह पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाने साजरा
खोची,(वार्ताहर):-खोची ता.हातकणंगले येथील युवा उद्योजक,हातकणंगले तालुका भाजपा अध्यक्ष,माजी उपसरपंच,सामाजिक कार्यकर्ते,अमरसिंह पाटील सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष अमरसिंह पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.सामाजिक उपक्रमात नेहमी अग्रेसर असलेल्या अमरसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एम. एस.आय.बल्ड बॅक,सांगली यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ६५ तरुणांनी रक्तदान केले. फौंडेशनच्या सहयोगातुन या रक्तपेढी मार्फत आज अखेर १११० गरजू रुग्णांना आजवर मोफत रक्त व पेशी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
यावेळी आमदार अमल महाडिक,माजी पंचायत समिती सदस्य वसंतराव गुरव,सरपंच रोहिणी पाटील,उपसरपंच प्रमोद गुरव,शिवाजी पाटील,महादेव विकास संस्थापक चेअरमन सयाजी पाटील, महावीर मडके, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विश्वास माने, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सलीम मुलाणी,तालुका उधोग आघाडी अध्यक्ष भगवानराव पाटील,पारगांव ग्रामपंचायत सदस्य उदय चाळके,सचिन पाटील,सुहास गुरव,पोपट गुरव,दिनकर पाटील,विरोचन शिंदे,महावीर मडके,संभाजी पाटील,चंद्रकांत घोडके,धनाजी गुरव,सर्जेराव माने,अजित मडके ,दिग्विजय मगदुम,गुणधर मडके,राहूल पाटील,अनिल चौगुले,ऋषिकेश पाटील,शशिकांत मगदूम यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी,अनेक मान्यवरांनी भेटून शुभेच्छा दिल्या.रक्तदान शिबिरांचे संयोजन अमरसिंह पाटील फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केले.