Home कोल्हापूर जिल्हा वाचनामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो – गटशिक्षणाधिकारी डॉ.विश्वास सुतार

वाचनामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो – गटशिक्षणाधिकारी डॉ.विश्वास सुतार

Advertisements

वाचनामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो – गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार

Advertisements

 

शाहुवाडी , (प्रतिनिधी):- वाचनामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार यांनी केले. श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित, उदगिरी हायस्कूल उदगिरी या ठिकाणी सदिच्छा भेट प्रसंगी ते बोलत होते .गटशिक्षणाधिकारी सुतार म्हणाले अतिशय दुर्गम भागात शिक्षक ज्ञानदानाचे काम चांगल्या पद्धतीने करत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न चांगल्या प्रकारे करत आहेत. गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार यांचा सत्कार मुख्याध्यापक सुनिल घाटगे यांनी केला . त्यावेळी केंद्रप्रमुख सुनिल सुतार ,केंद्रप्रमुख मारुती गुरव ,संभाजी कांबळे ,प्रदीप वाडेकर ,सुभाष राऊत, शरद जाधव ,भिमराव वाघमारे आदी उपस्थित होते .स्वागत व प्रस्ताविक सहाय्यक शिक्षक शरद जाधव यांनी केले. आभार प्रदीप वाडेकर यांनी मानले.

Advertisements
Advertisements