शनिवारपासून नवे पारगांवची हनुमान यात्रा
नवे पारगाव: नवे पारगाव,ता.हातकणंगले येथे प्रतीवर्षाप्रमाणे आज शनिवार (दि.१२) पासुन ग्रामदैवत श्री हनुमान जयंती जन्मोत्सव दिनानिमीत्त श्री हनुमान देवाची लंका यात्रेचा मुख्य दिवस असुन गांवात उत्साह व चैतन्याचे वातावरण आहे.
आज शनिवार मुख्य दिवशी सकाळी श्री हनुमान जन्मोत्सव निमीत्त भजन,काकड आरती,पुजाभिषेक,असे दुपारपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत तर सायंकाळी ५ वा. पारंपारिक गावगाडामधुन ‘श्री’उत्सव मुर्तीची गांवातील मुख्य मार्गावरून सवाद्य धनगरी ढोल वाद्यात मिरवणुक निघणार आहे,रात्री शोभेच्या दारूची भव्य आतषबाजी रंगणार आहे, यात्रेनिमित्त खेळणे-पाळण्यांचे विविध स्टॉल्स,मेवा-मिठाईची दुकाने थाटली असुन मुख्य आकर्षण म्हणुन यात्रेकरूंसाठी ‘म्युझिक फौंटन शो’ चे यंदा आयोजन केले असल्याची माहिती नवे पारगावच्या सरपंच वर्षाराणी देशमुख,उपसरपंच निवास पाटील यांनी दिली.गावची यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत, सरपंच,उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी परिश्रम घेत आहेत.