Home कोल्हापूर जिल्हा निलेवाडी मैदानात अक्षय शेडगे विजयी

निलेवाडी मैदानात अक्षय शेडगे विजयी

Advertisements

निलेवाडी मैदानात अक्षय शेडगे विजयी

Advertisements

 

 

पेठ वडगाव : निलेवाडी तालुका हातकलंगले येथे हजरत पीर साहेब उरूस निमित्त कुस्ती मैदान उत्साहात संपन्न झाले . यावेळी सुरुवातीला सर्व मल्ल देणगीदार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पूजन केलं व त्यानंतर मिरवणुकीने सर्व मल्लांना मैदानात आणण्यात आले
आणि त्यानंतर अनेक प्रेक्षणीय लढती प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या .
यामध्ये यामध्ये पहिला क्रमांक अक्षय शेडगे पुणे यांनी अक्षय चौगुले सांगली याचा आतली टांग डावावर पराभव केला व पहिल्या क्रमांकाचे कुस्ती जिंकली यावेळी कुस्ती मैदान चालू असताना पावसाचा व्यक्ती आला तरी सुद्धा संयोजकांनी न डगमगता पाऊस थांबल्यानंतर पुन्हा जिद्दीने मैदान तयार केले व यावेळी मैदानात लहान मोठ्या अशा शंभर कुस्त्या रोख रकमेसह संपन्न झाल्या तसेच अनेक पुरस्कृत कुस्त्या संपन्न झाल्या त्याचा निकाल पुढील प्रमाणे प्रथम क्रमांकाच्या कुस्तीमध्ये अक्षय शेडगे पुणे विजयी विरुद्ध अक्षय चौगुले सांगली यामध्ये यांनी बाजी मारली दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये प्रथमेश गुरव वारणा विजयी विरुद्ध संकेत पाटील कोल्हापूर तिसरा क्रमांक शंकर माने पारगाव विजयी विरुद्ध संकेत पाटील राशिवडे तिसरा क्रमांक इर्शाद पठाण वारणा विरुद्ध सार्थक पाटील भामटे यांची कुस्ती बरोबरीत सोडवली तर चौथा क्रमांक मयूर बागडी निलेवाडी विजयी विरुद्ध प्रवीण खोत येणापूर पाचवा क्रमांक सौरभ बागडी निलेवाडी विजयी विरुद्ध प्रथमेश कांबळे डिग्रज सहावा क्रमांक निखिल बागडी निलेवाडी विजयी विरुद्ध सुयश पाटील कळे सातवा क्रमांक प्रणव पाटील कोल्हापूर विजयी विरुद्ध शुभम बागडी निलेवाडी अशा पुरस्कृत कुस्त्या झाल्या याशिवाय आणखी 35 पुरस्कृत झाल्या पावसाच्या व्यक्ती यानंतर सुद्धा अतिशय चांगल्या वक्त टप्प्यात कुस्त्या संपन्न झाल्या यासाठी निवेदक म्हणून ईश्वरा पाटील यांनी अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात निवेदन केले व पावसामुळे आलेली मरगळ दूर करून पुन्हा कुस्त्या संपन्न झाल्या पंच म्हणून वारणा तालमीचे संदीप पाटील पारगाव चे मारुती माने यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप महापुरे जालिंदर पाटील सुनील गोंडे संजय जाधव विश्वास बोरगे दीपक जाधव विजय जाधव शरद शेळके काम पाहिले . यावेळी सरपंच माणिक घाटगे उपसरपंच शहाजी बोरगे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष भापकर व वसंत खोत तंटामुक्त समिती अध्यक्ष बाजीराव शेळके ग्रामपंचायत सदस्य अमर घाटगे चेअरमन अशोक मोरे व प्रकाश भोसले वारणा कामगार सोसायटी संचालक संजय उरुणकर अमर जाधव सचिन खोत राजेंद्र मोहिते जयदीप घाटगे आनंदा खोत युवराज खोत जयसिंग भोसले जयसिंग मोहिते मधुकर खोत अनिल खोत आदी उपस्थित होते. सदर स्पर्धेसाठी सचिन खोत यांच्याकडून कायमस्वरूपी शिल्ड देण्यात आले. मैदानाच पूजन सरपंच माणिक घाटगे यांच्या हस्ते झाले.

Advertisements
Advertisements