अशोकराव माने यांनी स्वकर्तृत्वावर निर्माण केलेला उद्योग  नक्कीच अभिमानास्पद

    Advertisements

    हातकणंगले  :  महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व वारणा उद्योग समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे  (सावकर) यांनी आज देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी,तमदलगे येथे सदिच्छा भेट दिली.त्याचबरोबर या संस्थेची प्रगती आणि कार्यप्रणाली यांची माहिती घेत कौतुक केले. दरम्यान संस्थेचे संस्थापक चेअरमन व हातकणंगले तालुक्याचे भाजप-जनसुराज्य चे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने यांनी त्यांचे स्वागत केले.
    यावेळी बोलताना आमदार विनय कोरे म्हणाले, तमदलगे सारख्या ग्रामीण भागात सूत गिरणी सारखा उद्योग उभा करून तालुक्यातील हजारो हातांना काम देण्याचे कार्य अशोकराव माने यांनी केलं आहे.संस्था या निर्माण करण्यापेक्षा त्या योग्यरितीने चालवण्याची कसब असणे गरजेचे असून अशोकराव माने यांनी स्वकर्तृत्वावर निर्माण केलेला हा उद्योग  परिवार नक्कीच अभिमानास्पद आहे.
    यावेळी संस्थापक अशोकराव माने यांनी सूतगिरणीचा सुरू असलेला दैदिप्यमान प्रवास विषद केला. दरम्यान संस्थेच्या वतीने आमदार विनय कोरे यांचा जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे व हातकणंगलेचे माजी सरपंच संदीप कारंडे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. या कार्यक्रमास वडगाव चे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, पन्हाळ्याचे माजी पंचायत समिती सभापती रवींद्र जाधव, बाळासाहेब कळंत्रे, सूतगिरणी चे संचालक जितेंद्र चोकाककर, चिंतामणी निर्मळे, कार्यकारी संचालक दिलीप काळे,केदारलिंग चे कार्यकारी संचालक दिलीप माळी, स्वामी समर्थ चे कार्यकारी संचालक सुहास राजमाने,यासह जनरल मॅनेजर गजानन माने ,बाबजी पाटील, अक्षय पाटील, विजय पाटील, अनिल दिवटे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक धनंजय टारे यांनी केले.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements