Home कोल्हापूर जिल्हा पाण्याचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी–डॉ.विदुला स्वामी डीवाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठामध्ये...

पाण्याचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी–डॉ.विदुला स्वामी डीवाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठामध्ये जागतिक जल दिन उत्साहात

Advertisements

पाण्याचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी–डॉ.विदुला स्वामी ;
डीवाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठामध्ये जागतिक जल दिन उत्साहात

Advertisements

 

नवे पारगाव : पाणी हे जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे, आणि त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जलसंवर्धनतज्ज्ञ डॉ. विदुला स्वामी यांनी केले. पावसाचे पाणी साठवणे आणि त्याचा पुनर्वापर करणे ही काळाची गरज आहे. आपल्या छोट्या प्रयत्नांतून आपण मोठ्या प्रमाणात पाणी वाचवू शकतो, त्यामुळे प्रत्येकाने पाणी बचतीची सवय लावून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात आयोजित जागतिक जल दिन कार्यक्रमात डॉ. स्वामी बोलत होत्या.

डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभाग आणि डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्र महाविद्यालयाच्या स्टुडन्ट चाप्टर (इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स), आणि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स कोल्हापूर लोकल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक जल दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 35 वर्षाहून अधिक काळ शाश्वत पाणलोट विकास व जलसंवर्धनामध्ये काम करणाऱ्या कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्थापत्य विभागाच्या निवृत्त प्राध्यापिका व पर्यावरणवादी डॉ. विदुला अरुण स्वामी या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

डॉ. स्वामी म्हणाल्या, छतावरील पाणी साठवणे, स्वयंपाकघरातील पाण्याचा पुनर्वापर, सांडपाण्याचा पुनर्वापर, बागेमध्ये ठिबक सिंचनचा वापर, पाण्याचा अनावश्यक वापर टाळणे, गटारातील पाणी पुन्हा जमिनीत जिरवणे, समाजाच्या सहभागातून जलसंधारण मोहिमा राबवणे आदी माध्यमातून आपण जलसंवर्धणासाठी योगदान देऊ शकतो. सतत कमी होत असलेल्या जलसाठ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने पाणी वाचवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. हे बदल अगदी घराच्या पातळीवरून सुरू केल्यास मोठा प्रभाव पडू शकतो, त्यामुळे सर्वांना जलसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन यांनी प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले. जल सुरक्षेचे महत्त्व सांगत भविष्यातील पाणी संकट टाळण्यासाठी पाण्याचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले. कुलसचिव प्रा. डॉ.जयेंद्र खोत यांनी जागतिक जल दिनाचे महत्त्व नमूद केले. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स कोल्हापूर लोकल सेंटरचे अध्यक्ष इंजि. अजय देशपांडे यांनी प्रमुख वक्त्यांची ओळख तसेच कोल्हापूर लोकल सेंटरची कार्यप्रणाली व उपक्रमांची माहिती दिली. सचिव इंजि. योगेश चिमटे यांनी आभार मानले.

यावेळी डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटीचे कॅम्पस डायरेक्टर प्रा. डॉ. एस. बी. पाटील, डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. सतीश पावसकर, स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील, स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट ची अधिष्ठता डॉ. मुरली मनोहर भूपती, परीक्षा नियंत्रक डॉ. गुरुनाथ मोटे, वित्त अधिकारी श्री. सुजित सरनाईक, कृषी अभियांत्रिकी विभागाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. मंगल पाटील, उपप्राचार्य प्रा. प्रवीण ऊके, कृषी अभियांत्रिकी विभागाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक इंजि. अमोल शेळके व डॉ. संजानी साळुंखे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष प्रयत्न केले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील व विश्वस्त ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

तळसंदे- डॉ. विदुला स्वामी यांचे स्वागत करताना कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन. समवेत प्रा. डॉ. जयेंद्र खोत, प्रा. डॉ. सुहास पाटील, डॉ. सतीश पावसकर व इंजि. अजय देशपांडे आदी.

Advertisements
Advertisements