Home कोल्हापूर जिल्हा खोची परिसरात वादळी वाऱ्यासह वळीव पावसाची हजेरी

खोची परिसरात वादळी वाऱ्यासह वळीव पावसाची हजेरी

Advertisements

खोची परिसरात वादळी वाऱ्यासह वळीव पावसाची हजेरी

Advertisements

 

 

खोची,(भक्ती गायकवाड):-खोची परिसरात मंगळवारी रात्री ९ वाजता मान्सूनपूर्व वळीव पावसाने अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह हजरी लावली.

अचानक रात्री ९ वाजता प्रचंड विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह सुमारे अर्धा तास मोठ्या व अर्धा तास मध्यम स्वरुपाच्या पावसाने झोडपून काढले.त्यामुळे काही काळ रस्त्यावर पाणी साचले होते.या पावसामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने गारवा निर्माण झाल्याने थोड्या प्रमाणात समाधान लाभले.
जोरदार वाऱ्यासह पावसामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.आडव्या तिडव्या जोरदार पावसामुळे काही घरात कौलातून पावसाचे पाणी आले.त्यामुळे कुटुंबीयांची तारांबळ उडाली.काही ठिकाणी उसासह काढणीला आलेल्या गहू हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे.तर महिला वर्गाने सरपणासाठी लावलेल्या शेणी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे महिला वर्गातून अचानक आलेल्या पावसाबद्दल नाराजी निर्माण झाली.जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी पत्रा छप्परे यांचे नुकसान झाल्याचे समजते.

Advertisements
Advertisements