अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास एक दिवसाची पोलिस कोठडी
पेठ वडगांव, (प्रकाश कांबळे):- नागांव (ता.हातकणंगले) येथे पिण्यासाठी पाणी मागायला जावून दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर साठ वर्षाच्या सुरक्षारक्षकाकडून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुहास शंकर गावसाणे ( रा वाणेगल्ली सुभाष चौक, वैराग जि सोलापूर ) याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली .
शिरोली पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत नागाव गावच्या हद्दीत असणार्या चार चाकी कार गाड्यांचे पार्किंग डेपो आहे. या डेपोत गेली काही वर्षांपासून एक कुटुंबीय वाचमन म्हणून राहून येथील देखभाल करत आहे पण या परिसरात महागड्या कार पार्किंग असल्याने कार कंपनीने येथे खाजगी सिक्युरिटी नेमून येथे चौवीस तास गार्ड तैनात ठेवले आहेत पण रविवारी या पाईंटला कोणी सिक्युरिटी गार्ड आला नसल्याने दिवसभर या सिक्युरिटी कंपनीचा सुपरवायझर थांबला होता पण दुपारी हा साठ वर्षीय सुहास शंकर गावसाणे हा व्यक्ती जेवणाचा बहाणा करून येथे आला व त्याने सुपरवायझरकडे पिण्यासाठी पाणी मागितले पण सुपरवायझरने त्याला वाचमन कुटुंबीयच्या घरातून पाणी आनण्यास सांगितले असता या सुहासने अल्पवयीन मुलीकडून पाणी घेवून तीला बाजूस असणार्या जनावरांच्या गोठ्यात नेले व आपले स्वताचे कपडे काढून लज्जास्पद वर्तन करत या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला .मुलीने आरडाओरड केल्यावर घरात झोपलेल्या आजीला जागं आल्यावर तिने गोठ्याकडे धाव घेवून प्रकार पाहीले असता सुहासने पलायन करण्याचा प्रयत्न केला पण आजीने त्यास आडवून झाडूने मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले .
काल सोमवारी सकाळी शिरोली पोलिसानी त्याला पेठवडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली .