लोक भावनेचा आदर करत देवा भाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज विघापीठ नाम विस्तार जाहीर करावा – आम. राजासिंह ठाकूर
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार चालू आधिवेशानामध्ये जाहीर करून मुख्यमंत्री देवा भाऊ – देवेंद्र फडणवीस यांनी लोकभावनेचा आदर करावा असे आव्हान आमदार तेलंगणा राजासिंह ठाकूर यांनी केले जिल्हाधिकारी कार्यासमोर भव्य मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाल्यानंतर त्यांनी आपले परखड मिळते व्यक्त केले .भर उन्हात निघालेला हा मोर्चा त्यामधील तीव्र लोकभावना लक्षात घ्याव्यात आणि पुन्हा यासाठी मुंबईला धडक मोर्चा काढण्याची वेळ येऊ देऊ नये असे त्यांनी यावेळी केले . ध्येय मंत्राने या मोर्चा आणि जाहीर सभेची सांगता झाली .
त्यापुर्वी ऐतिहासिक दसरा चौकातून ‘शिवाजी विद्यापीठ’, या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण उल्लेख असल्याने विद्यापीठाचे नाव अधिक सन्माननीय आणि पूर्ण स्वरूपात ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असे करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्यावतीने ऐतिहासिक दसरा चौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा लक्ष्मीपुरी व्हिनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी या सभेचे या त्याचे सभेत रुपांतर झाले . या मोर्चामध्ये हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट , महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक अभिजित पाटील, ‘छत्रपती ग्रुप’चे संस्थापक प्रमोद पाटील, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष गजानन तोडकर, वीर शिवा काशीद यांचे वंशज आनंदराव काशीद, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष राजू तोरस्कर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अरुण गवळी, श्री स्वामी समर्थ महालक्ष्मी मंदिराचे संजय हसबे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी यांच्यासह बजरंग दल दुर्गा वारकरी संप्रदाय वारकरी सह धारकरी सह विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते होते.
‘विद्यापीठाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, या जय घोषणा सह मोर्चासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सहभागी असलेल्या सरदार-मावळे यांचे वंशज उपस्थित रहाणार आहेत. या मोर्चात ढोल-ताशा पथक, मर्दानी खेळ, शिवकालीन युद्धपथक, वारकरी-टाळकरी यांचे पथक, विविध संप्रदायांचे भक्त, मावळ्यांची वेशभूषा यांसह पारंपरिक वेशभूषा, महिलांचे रणरागिणी पथक सहभागी झाली होती . ‘ या मोर्चा ने शिवाजी विद्यापीठ नाम उस्ताद नामविस्तारचा प्रश्न ऐरणीवर आला आहे राज्य शासनाने अधिक वेळ न पापा या नामविस्तारावर शिक्कामोर्तब करावे असे आवाहन असे जाहीर आहवान सर्वांच्या वतीने यावेळी आमदार राजासिंह ठाकूर यांनी केले . महिला सहभागी सर्वांना बाबत पाणी वाटप करण्यात येत होते तसेच यावेळी सहभागी सर्वांचे आणि नागरिकांचेही स्वाक्षरी अभियान पाठिंबासाठी राबविण्यात आले .