Advertisements
सर्वोदय नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी माधव गुळवणी, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांची निवड
Advertisements
नवे पारगाव , ता. १७: तळसंदे (ता. हातकणंगले) येथील सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी माधव प्रभाकर गुळवणी, उपाध्यक्षपदी दिलीप मारुती चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. बी. नाईक व सहाय्यक म्हणून संस्थेचे सचिव भैरू बाबुराव चव्हाण यांनी काम पाहिले.
पंचवार्षिक निवडणूक वारणा दूध संघाचे संचालक माधव प्रभाकर गुळवणी यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. वारणा दूध संघाचे तज्ञ संचालक मोहन येडूरकर यांचे सहकार्य लाभले.
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी संचालक संपत चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, हंबीरराव चव्हाण, सर्जेराव चव्हाण, अरुण चव्हाण, सुभाष पोवाळकर, सावित्री पाटील, आनंदी खामकर, राजू इसुफ तांबोळी, भानुदास कांबळे, मारुती वडर उपस्थित होते.
Advertisements
Advertisements