Home कोल्हापूर जिल्हा मनपाडळेत वन्य प्राण्याचा मेंढ्यांच्या तळावर हल्ला 13 मेंढ्यांची पिलले ठार

मनपाडळेत वन्य प्राण्याचा मेंढ्यांच्या तळावर हल्ला 13 मेंढ्यांची पिलले ठार

Advertisements

मनपाडळेत वन्य प्राण्याचा मेंढ्यांच्या तळावर हल्ला 13 मेंढ्यांची पिल्ले ठार

Advertisements

 

पेठवडगाव : हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथे वन्यप्राण्याच्या हल्ल्यात 13 मेंढ्यांची पिल्ले ठार झाली तर 3 मेंढ्यांची पिल्ले जखमी झाले. त्यामुळे मेंढपाळ बांधवांच्या त दहशतीचे वातावरण आहे यात मेंढपाळाचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.

मनपाडळेच्या दक्षिण बाजूला मोकाशी मळ्यात भासले यांच्या शेतात मागील तीन आठवड्यापासून खतासाठी दिलीप बंडगर या मेंढपाळाच्या सुमारे 200 मेंढ्या शेतात बसविल्या होत्या. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास भोसले यांच्या शेतात मेंढ्यांची पिल्ले होती. यावर अचानक वन्यप्राण्याने हल्ला चढविला. यात 7 मेंढ्यांची पिल्ले मारली गेली. तर 6 पिल्ले वन्यप्राण्याने पळवली व 3 जखमी झाले आहेत. नेमका कोणत्या प्राण्याने हल्ला केला हे समजू शकले नाही.
याची माहिती मिळताच सोमवारी सकाळी नरेंदेचे वनपाल एम. एस.पोवार, वनसेवक श्रद्धा सोनटक्के यांनी घटनेची पाहणी करत पंचनामा केला. पशुधन अधिकारी डॉ.अश्विनी बोंगार्डे यांनी शवविच्छेदन केले.
मेंढ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे आणि शवविच्छेदनाने परिसरात वास पसरल्याने गावठी व जंगली कुत्रे दिवसभर मेंढपाळांना त्रास देत होती. मेंढपाळाचे सर्व कुटुंब दिवसभर उरलेल्या मेंढ्यांची रक्षण करीत होते. त्यामुळे परिसरात व मेंढपाळ बांधवांच्या भीतीचे वातावरण आहे.

Advertisements
Advertisements