Home सामाजिक बच्चे सावर्डे येथे आरोग्य शिबिर संपन्न

बच्चे सावर्डे येथे आरोग्य शिबिर संपन्न

Advertisements

बच्चे सावर्डे येथे आरोग्य शिबिर संपन्न

Advertisements

 

बच्चे सावर्डे, प्रतिनिधी (सुनिल पाटील):- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिवित नोंदणी असणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे बच्चे सावर्डे येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश सचिव डॉ. स्वाती पाटील होत्या.
राजमाता बहुउद्देशीय महिला मजुर सेवाभावी संस्था मलकापूर तर्फे बांधकाम कामगारांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.यावर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा माधुरी अशोक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि धन्वंतरी पूजन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव डॉ.स्वाती पाटील यांनी उपस्थित सर्व महिलांना मार्गदर्शन करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ.निलेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोग्य शिबिरामध्ये सोनोग्राफी सर्व प्रकारचे औषधे तसेच ब्लड टेस्ट चेक अप इत्यादी सुविधा लाभार्थी कामगारांना उपलब्ध करून देण्यात आल्या. या शिबिराचा ४०० हून अधिक कामगारांनी लाभ घेतला. या शिबिरासाठी मा. कामगार आयुक्त विशाल घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष माधुरी देसाई, दिपाली कापसे,ज्योती बच्चे, तेजस्विनी जगताप, सुनिता कापसे,सरिता कांबळे, सिमा जगदाळे निसर्ग बच्चे यांचे सहकार्य लाभले.

Advertisements
Advertisements