पाटणच्या कै.ज्ञानोजीराव साळुंखे शैक्षणिक संकुलात महिला दिन उत्साहात संपन्न

    Advertisements

    पाटणच्या कै. ज्ञानोजीराव साळुंखे शैक्षणिक संकुलात महिला दिन उत्साहात संपन्न

    Advertisements

     

     

    पाटण : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित पाटण (जि. सातारा ) येथील कै . ज्ञानोजीराव साळुंखे शैक्षणिक संकुलात *जागतिक महिलादिन* विविध उपक्रमानी साजरा झाला. संकुलाचे प्रमुख प्राचार्य श्री दिलीपराव चरणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
    संकुलातील शिशुविहारच्या प्रमुख सौ कविता जंगम, प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका सुजिता गायकवाड, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका शबनम सातारकर, हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका सुनंदा पाटील, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. केदार होगले, गुरुजन डी. एड. कॉलेजचे प्राचार्य महेश्वर ओहळ, ज्युनिअरचे प्रभारी विभाग प्रमुख प्रा. महादेव देसाई, वसतिगृह अधीक्षक जितेंद्र पाटील, वरिष्ठ लिपिक अशोक मोहिते यांच्या सह सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक पिता – माता उपस्थित होते. सर्व ज्ञानशाखां मधील 23 महिला शिक्षिका – प्राध्यापिका यांचा सन्मान संकुलातील प्राध्यापक – शिक्षकांच्या वतीने संपन्न झाला.
    सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. संगीता मोहिते यांनी स्वागत केले. शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष कलाश्री अमरसिंह भागवत यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक श्री ए. ए. पवार व प्राचार्य दिलीपराव चरणे यांच्या सह १६ विद्यार्थी – विद्यार्थिनी यांची भाषणे, स्त्री – सक्षमीकरण विषयी विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य, समूहगीत, कविता गायन आदी उपक्रम राबवून *नारी शक्तीचा जागर* करून महिला दिन विविध उपक्रमानी उत्साहात साजरा झाला.
    संगीत शिक्षक रमेश गुरव यांनी स्वागत केले. विद्यालयाचे क्रीडा प्रमुख काशिलिंग जे. शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. एनसीसी अधिकारी श्री सतीश पाटील यांनी आभार मानले.

     

    Advertisements
    Advertisements