Home कोल्हापूर जिल्हा बळवंतराव यादव विद्यालयात महिला दिन विविध उपक्रमाने साजरा

बळवंतराव यादव विद्यालयात महिला दिन विविध उपक्रमाने साजरा

Advertisements

बळवंतराव यादव विद्यालयात महिला दिन विविध उपक्रमाने साजरा

Advertisements

 

 

 

 

पेठवडगाव : (प्रतिनिधी):-जागतिक महिला दिनानिमित्त पेठवडगाव येथील बळवंतराव यादव विद्यालयात विविध उपक्रमाने महिला दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून श्री.विजयसिंह यादव वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका वर्षाराणी सहदेव व पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता पवार उपस्थित होत्या. यावेळी प्राचार्य अविनाश पाटील, उपमुख्याध्यापिका मनीषा पोळ, पर्यवेक्षक मनोज शिंगे, संताजी भोसले, पी. बी. पाटील, ज्येष्ठ अध्यापक श्रेणिक सरडे, मानसी बुवा प्रमुख उपस्थित होते.प्रतिमापूजन उपमुख्याध्यापिका मनिषा पोळ यांनी केले.

त्यानंतर प्राचार्य अविनाश.पाटील ,पर्यवेक्षक.मनोज
शिंगे, संताजी भोसले,पी.बी.पाटील ,अध्यापक-अध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनीही प्रतिमेस अभिवादन केले.

याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थीनींनी विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या महिलांच्या व्यक्तिरेखा सादर केल्या . या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या वर्षाराणी सहदेव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता पवार यांनी मुलींच्या सुरक्षेबाबत आणि सोशल मीडिया वापरताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. अश्विनी बंडगर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रज्ञा कुंभार यांनी आभार मानले.

या कार्यक्रमासाठी वैशाली पवार, प्रशांती बसागरे, शैलजा पाटील, संजीवनी दिंडे,जिज्ञासा पाटील,अक्षदा तळेकर, स्नेहल पाटील, शुभांगी चव्हाण,विनया देसावळे,सिमा पाटील,अर्चना मुळे,अलका काशिद, प्रियांका परीट, अर्चना बोराटे,एस.ए.फरांदे, रोहिणी पकाले, पेटकर मँडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्था उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव (आईसाहेब),संस्था अध्यक्ष व माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ,संस्था सचिव सौ.विद्या गुलाबराव पोळ (ताईसाहेब), कार्यवाह अभिजीत गायकवाड (दादा) यांची प्रेरणा व प्रोत्साहन लाभले.

Advertisements
Advertisements