Home शैक्षणिक आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हेमवसू फाउंडेशनतर्फे दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे येथील...

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हेमवसू फाउंडेशनतर्फे दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे येथील विद्यार्थ्यांना 3D पुस्तकांचे वाटप

Advertisements

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हेमवसू फाउंडेशनतर्फे दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे येथील विद्यार्थ्यांना 3D पुस्तकांचे वाटप

Advertisements

 

 

सैतवडे, रत्नागिरी :– अंतर राष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून हेमवसू फाउंडेशनच्या वतीने ‘द मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे’ येथील इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषरूपाने तयार केलेली A to Z 3D या पुस्तके वितरित करण्यात आली. या पुस्तकांचे वितरण सौ. स्वप्नाली बोरसुतकर यांच्या हस्ते करण्यात आले, तर प्रमुख उपस्थिती हेमवसू फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. हर्षल पेढे यांची होती.
या प्रसंगी शाळेचे शिक्षक श्री. विनोद पेढे, श्री. रुमान पारेख, सौ. जाधव मॅडम आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शिक्षण अधिक रंजक आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने हेमवसू फाउंडेशनकडून हा उपक्रम राबवण्यात आला. उपस्थित शिक्षकांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले, तसेच विद्यार्थ्यांनीही ही पुस्तके मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.
हेमवसू फाउंडेशन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी केवळ शैक्षणिक साहित्य पुरवणाऱ्या संस्थेपेक्षा अधिक आहे; आम्ही त्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी कार्यरत आहोत. आधुनिक शिक्षणपद्धती, डिजिटल साक्षरता आणि नव्या युगातील करिअर संधी यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ‘द मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे’चे मुख्याध्यापक श्री. विलासराव कोळेकर सर आणि मुस्लिम एज्युकेशन सोसायटी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल हेमवसू फाउंडेशन त्यांचे विशेष आभार मानते. त्यांच्या पाठिंब्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Advertisements
Advertisements