Home कोल्हापूर जिल्हा केखलेत विहिरीत पडलेल्या उदमांजरास जीवदान

केखलेत विहिरीत पडलेल्या उदमांजरास जीवदान

Advertisements

केखले ता.पन्हाळा येथील श्रीधर पाटील यांच्या विहिरीत पडलेल्या उदमांजरास विहिरीतुन काढून जगंलात सोडन्यात आले. याप्रसंगी वनरक्षक योगेश पाटील, सरपंच हंबीरराव चौगुले, श्रीधर पाटील, व वन्यजीव पथक दिसत आहे.

Advertisements

 

 

 

केखलेत विहिरीत पडलेल्या उदमांजरास जीवदान

वारणानगर /(प्रतिनिधी):-केखले येथील श्री दत्त मंदिर माळवाडी परिसरातील श्रीधर सर्जेराव पाटील यांचे शेतातील विहीरीत ऊद मांजर या जातीचे मांजर पडलेले आढळून आले. त्याची माहीती पाटील यांनी वनविभाग पन्हाळा यांना दिली तात्काळ वनविभागाच्या वन्यजीव पथकाने त्याला जीवदान देत विहिरीतून वर काढून त्याला नेसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
सकाळी साडे अकरा वाजता सागर पाटील हे विहीर वर मोटर चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना विहिरीत पाण्यात पोहत असलेलं उदमांजर दिसले त्यांनी ही बातमी सरपंच हंबीरराव चौगले यांनी दिली यांनी
वनविभागाचे वनरक्षक योगेश पाटील यांना दिली. वनपाल सागर पटकारे यांच्या मार्गदर्शना खाली वन्यजीव टीमसह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन विहीरीत पडलेल्या ऊद मांजरास पकडण्यासाठी विहीरत खाली उतरून सापळा लावून जाळ्यात पकडले. त्यावेळी विहीरितून बाहेर काढले व वन्यजीवपथकाने त्यास पुन्हा जंगलात सोडून दिले.
यावेळी श्रीधर पाटील, सरपंच हंबिरराव चौगले, के.आर. पाटील यांनी वनरक्षक योगेश पाटील व वन्यजीव पथकाचे अजिंक्य बचेकिरण कुंभार अतुल पाटील यांचे आभार मानले.

यावेळी बाबासाहेब सुर्यवंशी, अजित पाटील, प्रकाश पाटील, मारुती गुरव, जयसिंग पाटील सुधीर पाटील,ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisements
Advertisements