तळसंदे पारगाव पाणीपुरवठा संस्थेची निवडणूक बिनविरोध
नवे पारगाव (वार्ताहर):-तळसंदे ता.हातकणंगले येथील तळसंदे पारगाव सहकारी पाणीपुरवठा संस्थेची निवडणूक वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली व वारणा दूध संघाचे संचालक प्रदीप देशमुख व माजी सरपंच अँड दौलतराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एफ डी जमादार व सहायक निवडणूक अधिकारी म्हणून आर जी पाटील यांनी काम पाहिले .
तळसंदे व पारगाव दोन्ही गावचे कार्यक्षेत्र असणाऱ्या संस्थेची निवडणूक दोन्ही गावातील सर्वच गटाच्या प्रमुखांनी सहकार्य केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. नवनिर्वाचित संचालक मंडळाचे असे÷ बाबासाहेब पाटील, कृष्णात चव्हाण -मेजर ,बाबासाहेब चव्हाण पाटील -केबल ,बजरंग उर्फ मारुती मोहिते ,वसंत पाटील – बोने ,राजेंद्र देशमुख, महादेव चौगुले, रामेश्वर चव्हाण, नामदेव परीट, संदीप शिंदे, कल्पना देशमुख, रोहिणी पाटील .
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी वारणा दूध संघाचे संचालक माधव गुळवणी, बी आर चव्हाण ,माजी पोलीस पाटील
हौसेराव पाटील, माजी सरपंच अमरसिंह पाटील ,तळसंदे वारणा पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन यशवंत पाटील, ग्रा.पं. सदस्य किरण मोहिते, नवजीवन सेवा संस्थेचे चेअरमन नंदकुमार चव्हाण ,माजी उपसरपंच शिवाजी पाटील ,सचिन पाटील ,कुबेर चव्हाण बळवंत पाटील ,रावसाहेब मोहिते, दिनकर चव्हाण यांचे सहकार्य लाभले.