Home कोल्हापूर जिल्हा डॉ.सायरस पुनावाला स्कूलमध्ये डॅडी मास्टर शेफ उपक्रम उत्साहात साजरा

डॉ.सायरस पुनावाला स्कूलमध्ये डॅडी मास्टर शेफ उपक्रम उत्साहात साजरा

Advertisements

डॉ.सायरस पुनावाला स्कूलमध्ये डॅडी मास्टर शेफ उपक्रम उत्साहात साजरा

Advertisements

 

 

पेठ वडगाव : येथील श्रीमती विजयादेवी यादव प्री – प्रायमरी स्कूलमध्ये आयोजित “डॅडी मास्टर शेफ फायरलेस कुकिंग ” इव्हेंटमध्ये वडिलांनी आपल्या पाल्यासोबत आपली पाककलेतील कौशल्य दाखवली. बाहेरील जगातील विविध कामे करणाऱ्या वडिलांनी आपण स्वयंपाक घरातील कामात निपुण असल्याचे यावेळी दाखवून दिले.
मुलांसोबतचे कौटुंबिक बंध आणि सकस आहाराची भावना वाढीस लागावी या उद्देशाने शाळेच्यावतीने डैडी मास्टर शेफ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये वडिलांनी पाककलेतील कसब दाखवत विविध स्वादिष्ट पदार्थ तयार केले. यामध्ये दही फ्रूट स्पेशल रायता, स्प्राउट मटकी चाट, व्हेजिटेबल सँडविच, ऑरेंज दही वडा आणि मस्ती विथ चॉकलेट सारख्या स्वादिष्ट पदार्थांचा समावेश होता.

खाद्यपदार्थांचे परिक्षण सागर फरांदे , मीनल पाटील, अश्विनी पाटील यांच्या पॅनेलने केले.

सदरच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक संघाचे चेअरमन श्री. राहुल पोवार सर श्री. आर. बी. नांगरे सर श्री. अभिजीत गायकवाड, सौ. मनीषा यादव , उपस्तित होते.

प्राचार्य डॉ. सरदार जाधव यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आणि पालकांच्या सहभागामुळे शालेय अनुभव अधिक समृद्ध होतो, हे नमूद केले.
शाळेचे प्रशासकीय अधिकारी सागर पाटील यांनी पालक व विजेत्यांचा सत्कार केला.

 

Advertisements
Advertisements