कोजिमाशि पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार तसेच स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्काराचे मान्यवरांचे हस्ते वितरण.
हेरले / (प्रतिनिधी):- कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर या संस्थेचा सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा पारितोषिक वितरण समारंभ व ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान’ पुरस्कार प्राप्त शाळांचा सन्मान सोहळा स्वामी विवेकानंद कॉलेज परिसरात डॉ बापूजी साळूंखे स्मृती भवन कोल्हापूर येथे रविवार दि. २३ रोजी संपन्न झाला.समारंभाचे अध्यक्षस्थानी ॲड. धनजंय पठाडेसो (प्रसिद्ध विधी तज्ञ कोल्हापूर),
प्रमुख पाहूणे किरण पाटील ( विशेष लेखाधिकारी), कौस्तुभ गावडे (सीईओ, श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर), जयश्री जाधव (शिक्षण विस्तार अधिकारी माध्यमिक), राहूल पवार (चेअरमन, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ) आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक तज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी केले. यावेळी त्यांनी कोजिमाशि पतसंस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध सभासद हिताच्या योजनांची माहिती सांगितली. कर्जमुक्ती योजना, गुणवंत विद्यार्थी सत्कार व भक्कम आर्थिक प्रगतीचा आढावा आपल्या मनोगतातून दादासाहेब लाड यांनी घेतला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील ‘ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ पात्र ४० शाळांना मानपत्र, भिंतीवरील घड्याळ, प्लास्टिक समृद्धीची बादली देऊन सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. यावेळी मयत सभासदांचे वारसाना कर्ज मुक्ती योजनेतून कर्ज माफी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. दहावी – बारावी परीक्षा गुणवंत विद्यार्थी, शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, शासकीय स्पर्धा राज्य व राष्ट्रीय स्तर खेळाडूचा सत्कार पारितोषिक ,सन्मानचिन्ह व रोख १००० रुपये देऊन सुमारे ३०३ विद्यार्थ्याना सन्मानीत करण्यात आले. यावेळी जिल्हा विशेष लेखा अधिकारी किरण पाटील, जिल्हा परिषद शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री जाधव यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ धनंजय पठाडे म्हणाले, कोजिमाशि पतसंस्थेने सभासद हिताच्या अनेक योजना राबवून आदर्शवत कारभार केला आहे असे प्रतिपादन केले . गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात यशाची उच्च शिखरे गाठवित, स्पर्धेच्या युगात सतत नवनवीन ज्ञान आत्मसात करावे असा संदेश दिला.
कार्यक्रमास शिक्षक नेते दादासाहेब लाड ( कोजिमाशि पतसंस्था तज्ञ संचालक), राजाराम शिंदे (चेअरमन कोजिमाशि), शरद तावदारे (व्हा. चेअरमन), जयवंत कुरडे (सीईओ),कोजिमाशि पतसंस्था संचालक लक्ष्मण डेळेकर, अनिल चव्हाण, डॉ. डी एस घुगरे, राजेंद्र रानमाळे,श्रीकांत कदम, दिपक पाटील, मनोहर पाटील, सचिन शिंदे, ऋतुजा पाटील, मदन निकम , प्रकाश कोकाटे, श्रीकांत पाटील , उत्तम पाटील, पाडूरंग हळदकर, अविनाश चौगले, सुभाष खामकर, जितेंद्र म्हैशाळे, राजेन्द्र पाटील, शितल हिरेमठ, तज्ज्ञ संचालक आनंदा व्हसकोटी, उत्तम कवडे (डे.सीईओ) आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन एस पी पाटील यांनी केले.आभार चेअरमन राजाराम शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी, सभासद, पालक, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.