मौजे वडगांव येथे ‘ प्रधानमंत्री ‘ आवास व पहिल्या हप्त्याचे वितरण
हेरले /(प्रतिनिधी):- ‘ प्रधानमंत्री ‘ आवास योजनेअंतर्गत राज्यात एकाच दिवशी १० लाख लाभार्थ्यांना मंजूरीपत्र व पहिला हप्ता जमा होत आहे . त्या अनुषंघाने मौजे वडगांव ग्रामपंचायतीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करून प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामिण ) टप्पा २ अंतर्गत १३ लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजूरीपत्र व पहिल्या हप्त्याचे वितरण सरपंच कस्तुरी पाटील व उपसरपंच रघूनाथ गोरड यांच्या हस्ते करण्यात आले.
सदरचा कार्यक्रम मौजे वडगांव ग्रामपंचायतीच्या शाहू सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या योजनेतून लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी व रोजगार हमी योजनेतून १ लाख ४० हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी भारती ढेंगे पाटील , माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुनिल खारेपाटणे, स्वप्नील चौगुले, सुरेश कांबरे, सविता सावंत, सुनिता मोरे, सुवर्णा सुतार, दिपाली तराळ , मिनाक्षी आकिवाटे , पोलिस पाटील अमिर हजारी, अविनाश पाटील, मुख्याध्यापक बाळासो कोठावळे , यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते .