Home कोल्हापूर जिल्हा हेरले येथे प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा २ मधील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र...

हेरले येथे प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा २ मधील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप

Advertisements

हेरले येथे प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा २ मधील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप

Advertisements

 

 

हेरले /(प्रतिनिधी):-प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा २ मधील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व प्रथम हप्ता वितरण शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास व पंचायतराज्ञ मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पुणे येथे ऑनलाइन करण्यात आले.

यावेळी हेरले( ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायत हेरले यांच्या वतीने मराठी शाळा येथे ऑनलाईन प्रक्षेपण दाखवण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण माजी सभापती जिल्हा परिषद कोल्हापूर डॉ. पद्माराणी पाटील यांच्या शुभहस्ते ७० लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच राहुल शेटे उपसरपंच निलोफर खतीब, ग्रामपंचायत सदस्य बक्तीयार जमादार,मनोज पाटील, राकेश जाधव,उर्मिला कुरणे,सविता पाटील, शुभांगी चौगुले, सुशीला परमाज,रंजना माने, ग्रामपंचायत अधिकारी बी एस कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

फ़ोटो:-हेरले येथे प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा २ मधील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप करत असताना माजी सभापती डॉ पद्माराणी पाटील, सरपंच राहुल शेटे,उपसरपंच निलोफर खतीब व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Advertisements
Advertisements