Home कोल्हापूर जिल्हा शिवजयंती निमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने विविध स्पर्धा उत्साहात संपन

शिवजयंती निमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने विविध स्पर्धा उत्साहात संपन

Advertisements

शिवजयंती निमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने विविध स्पर्धा उत्साहात संपन

Advertisements

 

 

नवे पारगाव, ता.१४: “शिवाजी महाराजांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम करीत
विविध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांच्या विकासासाठी महासंघ प्रयत्न करीत आहे”. असे गौरवोदगार पाराशर शैक्षणिक संकूलचे प्राचार्य एन. आर. यादव यांनी नवे पारगांव येथे काढले.
अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा पारगावच्यावतीने शिवजयंती निमित्ताने वक्तृत्व निबंध, चित्रकला व रांगोळी शालेय स्पर्धा पाराशर हायस्कूलमध्ये पार पडल्या. यावेळी प्राचार्य यादव बोलत होते.
चावराई माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले.
स्पर्धा परीक्षेतून महसूल सहाय्यकपदी निवड झालेल्या शाल्मिकी घाटगे, पीएचडी प्राप्त, अभियंता राहुल परमणे, ज्ञानज्योती रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल गणेश लोळगे यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत विविध शाळांचे २५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
त्यावेळी शाल्मिकी घाटगे, राहुल परमणे, गणेश लोळगे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संदिप जाधव, प्रकाश नेर्लेकर आनंदराव मगदूम जे. बी. पाटील, मच्छिंद्र पाटील, चंद्रकांत पाटील अभिजीत साळुंखे प्रल्हाद पाटील, प्रवीण खोपकर, जगदीश पाटील, संतोष जाधव, ऋषिकेश पाटील, एस. एस. आंबी, ए. वाय. पाटील, ए. पी. पाटील, एस टी चाळके, अजित भोसले व सर्व सहभागी शाळांचे मार्गदर्शक शिक्षक व पालक उपस्थित होते. महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी आभार मानले. अमृता जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

 

Advertisements
Advertisements