चावराई माध्यमिक विद्यालयात ” चावराई हस्तलिखीत” प्रकाशन, पारितोषिक वितरण सोहळा
पेठवडगाव : “पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारी जगातील दैनंदिन व्यवहाराबाबत विद्यार्थ्याना ज्ञान असणे गरजेचे आहे” असे मत सार्वजनिक बांधकाम खात्याचे निवृत्त उपअभियंता एम.आर. पाटील यांनी चावरे (ता. हातकणंगले) येथे व्यक्त केले.
ते चावरे येथील चावराई माध्यमिक विद्यालयात क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण, ‘चावराई हस्तलिखित’ प्रकाशन, दहावी विद्यार्थी शुभेच्छा समारंभात बोलत होते. व्यासपीठावर हातकणंगले तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, ग्राम विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष दिपकराव शिंदे, वारणा बँकेचे माजी संचालक माणिकराव निकम, माजी उपसरपंच रमेश गुरव उपस्थित होते.
विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. स्वागत व प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक एस. एस. पाटील यांनी उपक्रमांचा आढावा घेतला. मुख्याध्यापक एस. एस पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा व मान्यवरांच्या हस्ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेस भेटवस्तू प्रदान केली. मान्यवरांच्या हस्ते हस्तलिखित प्रकाशन सोहळा, वार्षिक क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरण, पार्थ नामदेव सिद यास आदर्श खेळाडू म्हणून सन्मानीत करण्यात आले. अध्यापिका एस. ए. पाटील व विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले. यावेळी संगीत मार्गदर्शक भानुदास काशिद, सी. एस. पाटील, ए. वाय. पाटील, एन. व्ही. बिडकर, एम. एस. धोंगडे, डी. ए. पाटील यांनी नियोजन केले. जे. एस. कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती ए. व्ही. वळगड्डे यांनी आभार मानले.