Advertisements
अंबप येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
Advertisements
नवे पारगांव,(प्रतिनिधी):- अंबप,(ता.हातकणंगले) येथील सचिन सदाशिव माळी (वय ३८) या तरुणाने आपल्या राहत्या घरी कुटूंबातील सर्व झोपेत असताना पहाटे ५ वा.दरम्यान घरातीतील तुळईस दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सदर घटणेची वर्दी यातील मयत सचीनचे चुलतभाऊ संदीप शंकर माळी यांनी वडगाव पोलीसात दिली.
कौटूंबिक नैराश्यातून गळफास घेतलेचे वर्दीदरम्यान संदीप माळी यांनी वडगाव पोलीसात सांगितले. याबाबत अधिक तपास पो.हे.कॉ. गुंडणके करत आहेत.
Advertisements
Advertisements