चांदोली अभयारण्य ग्रस्तांचा खुंदलापुर येथे वन विभागाच्या गेटवर ठिय्या
चांदोली,(प्रकाश कांबळे):-श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या चांदोली अभयारण्यग्रस्ताच्या आंदोलनाचा ३१वा दिवस असुन आज अखेर त्यांच्या न्याय मागण्यासाठी मंत्रालयात बैठक घेऊन त्यांच्या पुनर्वसनाचा अडथळा दुर करण्यासाठी शासन व प्रशासनाला अपयश आले आहे त्यामुळे त्यांनी आज शासनाच्या विरोधात खुंदलापुर येथील वन विभागाच्या गेटवर ठिया धरला.ज्या अभयारण्यग्रस्तानी पर्यावरणासाठी आपल्या जमिनी व कुराड बंदी करुन आपल्या जानाई मानाई केदार काळम्मा पावनाईच्या देवळासाठी वाढविलेले डंग सोडुन अभयारण्याच्या बाहेर आले त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न न करता त्यांच्या मरुन पडलेल्या मृतदेहावर आपण पर्यावरणासारखा व्यवसाय करुन उत्पन्न घेत आहात तर ते आम्ही बंद करून पर्यटकांना आवाहन करु इच्छितो कि तुम्ही पर्यटनांला न जाता तुम्ही वन विभागाच्या कार्यालयात जाऊन अभयारण्य ग्रस्तांचे प्रश्न आधी सोडवा मगच आम्ही पर्यटनाला जाऊ तोपर्यंत आम्ही ही त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ असा निर्णय आपण घ्यावा असे आवाहन करणार आहे.तसे करून ही प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात बैठक लागली आहे असा निरोप आला नाही तर आम्ही कोणत्याही वेळेस आमच्या देवांच्या डंगात जाणार काही गुन्हे घालायचे ते घाला असा इशाराही दिला
उद्या सकाळी बारा वाजता मनदूर येथे कॅनलच्या पुलावर बारा वाजता झोंळबी कडे जाणाऱ्या पर्यटकांचा रस्ता बंद करण्यात येईल असे आंदोलकांनी सांगितले.
आंदोलनात मारुती पाटील, दाऊद पटेल जगन्नाथ कुडतुडकर,एम. डी. पाटील,पांडुरंग कोठारी,विनोद बडदे, आनंदा आमकर,विष्णु पाटील, यांच्या सह शेकडो महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.