Home कोल्हापूर जिल्हा संस्कारातून समाज घडवणारी स्त्री ही स्वतःच एक शक्तीपीठ आहे – माजी नगराध्यक्षा...

संस्कारातून समाज घडवणारी स्त्री ही स्वतःच एक शक्तीपीठ आहे – माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ

Advertisements

संस्कारातून समाज घडवणारी स्त्री ही स्वतःच एक शक्तीपीठ आहे – माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ

Advertisements

 

 

 

पेठवडगाव : स्त्री ही सर्वप्रथम आपल्या कुटुंबाची शिल्पकार असते. ती एक मुलगी, एक पत्नी त्यानंतर एक माता या महत्वाच्या तीन भूमिका बजावते. त्यानंतर नात्यांच्या भूमिका आयुष्याबरोबर बदलत जातात. संस्कारातून समाज घडवणारी स्री ही स्वतःच एक शक्तीपीठ आहे. याचबरोबर हितगुज करुया मिळुन‎ साऱ्याजणी,हळदी कुंकू लेऊया हक्काच्या अंगणी या‎ उक्तीप्रमाणे स्त्रियांनी समता,बंधुता जोपासत सामाजिक सलोखा राखावा,हा संदेश‎ कल्याणी सखी मंचच्या अध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी दिला.
येथील‎ कल्याणी सखी मंचच्या वतीने‎ दरवर्षी प्रमाणे अध्यक्षा विद्याताई पोळ यांच्या‎ संकल्पनेतून रथसप्तमी निमित्त हळदी-कुंकू व‎ संक्रांतीचे वाण वाटप कार्यक्रम मोठ्या‎ उत्साहात संपन्न झाला.यावेळी दहा हजारहुन अधिक महिलांची उपस्थिती होती.माजी नगराध्यक्षा विजयादेवी यादव प्रमुख उपस्थितीत होत्या.

माहिलासाठी ट्रॅडिशनल लूक असलेला सेल्फी पाँइंट होता.याठिकाणी जाते पाटा वरवंटा ,चूल,स्टोव्ह,ताक घुसळणे,कोंबडी खुराडे,बाजले, बैलगाडी,उखळ, तांब्या पितळेची भांडी,पाण्याचा माठ,लाकडी पाळणा,पानावरील शेवया आदी सुरेख मांडणी केलेली होती.तसेच सबलीकरण व सशक्त महिला यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिला कलाकारांनी विद्याताईंचे बालपण व जीवनावर आधारित नाटीका सादर करणेत आली.सुत्रसंचालन संभाजी पाटील तर आभार मनिषा संकपाळ यांनी मानले.
यावेळी माजी नगराध्यक्षा शुभांगी कावडे,लता सुर्यवंशी
माजी नगरसेविका कल्पना शिंदे,हेमा,पवार,संगिता मिरजकर,परवीन फकीर,अनिता चव्हाण, डॉ.माधवी सावंत,नितादेवी नलवडे,स्वाती माळवे कल्पना भोसले, मनिषा पोळ,अश्विनी गायकवाड आदीसह कल्याणी सखी मंचच्या सदस्या उपस्थित होत्या.

Advertisements
Advertisements