Home आरोग्य समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी वाचवले अनेकांचे जीव, शिवनाकवाडी येथे झाली होती अन्नातून...

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी वाचवले अनेकांचे जीव, शिवनाकवाडी येथे झाली होती अन्नातून विषबाधा 

Advertisements

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी वाचवले अनेकांचे जीव,

Advertisements

शिवनाकवाडी येथे झाली होती अन्नातून विषबाधा

 

शिरोळ, (प्रतिनिधी):- शिरोळ आणि हातकलंगले तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या तत्पर आरोग्य सेवेमुळे शिवनाकवाडी येथे अन्नातून विषबाधा झालेल्या रुग्णांचे जीव वाचले.

शिवनाकवाडी  येथे यात्रे निमित्त केलेल्या जेवणामुळे सुमारे 600 जणांना विषबाधा झाली.नागरिकांना अचानक रात्री उलट्या मळमळ आणि जुलाब सुरू झाले. सकाळपर्यंत रुग्णांची ज संख्या झपाट्याने वाढली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.खटावकर आणि शिरोळ हातकणंगले तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी विद्यामंदिर शिवनाकवाडी येथे आरोग्य कॅम्प लावून तसेच उपकेंद्र शिरदवाड येथे आरोग्य कॅम्प लावून रुग्णांचे जीव वाचवले.

विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या 600 च्या वर गेली असून औषधोपचार करून घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 180 आहे तसेच 48 रुग्णांवर आयजीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

अन्न आणि औषध विभागाने पाणी आणि अन्न नमुन्यांची तपासणी सुरू केली असून विषबाधेचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शिवनाकवाडीच्या कल्याणी देवीची यात्रा सुरू आहे.या यात्रेनिमित्त केलेल्या जेवनामधून अनेक नागरिकांना रात्री उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खटावकर यांनी घटनास्थळी पोहोचून सर्व आरोग्य यंत्रणा कामाला लावली. पाचशे कर्मचारी,आरोग्य सेविका,आशास्वयंसेविका यांच्या पथकाने सर्व्हे  करून रुग्णांना उपचारासाठी पाठविले. सध्या वर्ग संख्या आटोक्यात आलेली आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या तत्पर सेवेमुळे अनेकांचे जीव वाचवले.

Advertisements
Advertisements