संतोष भाऊ मुरकुटे यांच्या कडुन 258 एसटी कर्मचाऱ्यांना अन्नधान्य किट वाटप

    Advertisements

    संतोष भाऊ मुरकुटे यांच्या कडुन 258 एसटी कर्मचाऱ्यांना अन्नधान्य किट वाटप

    परभणी : गंगाखेड (Parbhani gangakhed) शहरामध्ये भारतीय जनता पार्टी (BJP)मध्यवर्ती संपर्क कार्यालय कोद्री रोड,गंगाखेड gangakhed येथे गेल्या चार महिन्यापासून महाविकास आघाडी शासनाच्या बेजबाबदार, अविश्वासु धोरण व दुर्लक्षतेमुळे एसटी  कर्मचार्‍यांचा (St workers) शासनात विलनीकरणाचा लढा सुरु आहे.मागील 4 महिण्या पासुन विना पगार जीवन जगणारा एसटी कर्मचारी अत्यंत  दुखःदायी अवस्थेत सापडलेला आहे.
    ही जिव्हारी अडचण जेंव्हा संतोष भाऊं मुरकुटे( Santosh Bhau murkute )यांना समजली, तेंव्हा पासुन एसटी कर्मचार्‍यांसाठी काही तरी करण्याच्या प्रयत्नात होते..
    त्याचाच एक भाग म्हणून आज गंगाखेड आगारात ( Gangakhed depo)कार्यरत एसटी कर्मचार्‍यांचे सांत्वन करत त्यांना कर्तव्य रुपी “हात मदतीचा” देण्याच्या अनुषंगाने भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य मा.संतोषभाऊ मुरकुटे यांच्या वतीने गंगाखेड आगारातील 258 एसटी कर्मचार्‍यांना जिवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष परभणी डॉ.श्री.सुभाष कदम त्याच बरोबर प्रदेश कार्यकारणी सदस्य विठ्ठलराव रबदडे मामा, ॲड.व्यंकटराव तांदळे,मनोहर महाराज केंद्रे,गंगाखेड मंडळ अध्यक्ष कृष्णाजी सोळंके,पालम मंडळ अध्यक्ष शिवाजीराव दिवटे गुरुजी,भा.ज.पा नेते सुरेशदादा बंडगर,शहराध्यक्ष पप्पु मोटे, यासोबत अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.शेख बडे साहाब, विधी आघाडी जिल्हाध्यक्ष अँड. आदिनाथ मुंडे,सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,भा.ज.पा जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन लटपटे,ओ.बी.सी.जिल्हा उपाध्यक्ष विशाल मुंढे,गंगाखेड व्यापारी अघाडी ता.अध्यक्ष तथा लॉयन्स गंगाखेड टाउन चे अध्यक्ष अतुल गंजेवार यांच्या प्रमुख उपस्थिती हा भावनिक मदतरुपी कार्यक्रम संपन्न झाला.
    यावेळी विविध मान्यवरांचे एसटी कर्मचाऱ्यांशी तळमळ व्यक्त करत भविष्यात कायम खंबीर पणे त्यांच्या पाठीशी राहाण्याच्या भावनारुपी मत आपल्या शब्दात मांडण्यात आले.
    सुत्रसंचलन नगरसेवक तुकाराम तांदळे यांनी केले तर प्रास्तावीक अमोल दिवाण यांनी मांडले
    या वेळी काही एसटी कर्मचार्‍यांनी अपल्या भाषेत या दुखःद काळातील अनुभव मांडले.
    या वेळी इतर प्रमुख उपस्थीतीत भा.ज.पा चे गोंविंदभाऊ लटपटे,दिपक मुरकुटे,नंदकिशोर बलोरे,अँड.लिंबाजी घोबाळे, संगमित्र गायकवाड पवण करवर,हरिचंद्र साबळे,माधव शिंदे,भागवत तांदळे,कुनाल मुरकुटे,नामदेव शिंदे,शिवाजी शिंदे, भाजपा महिला आघाडीच्या सौ.पेकमताई , पद्ममजा ताई कुलकर्णी ,सौ. जोशी ताई, यांच्यासह असंख्य भा.ज.पा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
    एसटी कर्मचार्‍यांना अन्नधान्य किट मिळताचं त्यांच्या चेहर्‍यावर दिलासा दायक सुखः हे पाहाण्या योग्य होतं.
    कठीण काळात भाऊंनी दिलेला “हात मदतीचा” कायम लक्षात राहील अशी भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements