प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकरच निधी मंजुर करू- आमदार अशोकराव माने
पेठ वडगाव : भादोले प्राथमिक आरोग्य केंद्रास निधी उपलब्ध करून देण्या बाबत लवकरात लवकर प्रयत्न करून आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत उभारण्या बाबत निधी मंजुर करून इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी कार्यवाही करणार आहे असे प्रतिपादन आमदार अशोकरा माने यांनी केले
: भादोले प्राथमिक केंद्राची इमारत मुदतबाहय झाल्याने ती तात्काळ खाली करण्याचे आदेश संबंधीत विभागाने दिले आहेत . या संदर्भात आज आरोग्य केंद्रात बैठक आयोजित केली होती . यावेळी ते बोलत होते .अध्यक्षस्थानी आमदार अशोकराव माने होते .
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील वारणा बँक संचालक प्रकाश माने , रुग्ण कल्याण समिती सदस्य नाना जाधव,सुहास राजमाने,आरोग्य अधिकारी डॉ .अजिंक्य हाके , डॉ . सुदवेश्वर गुठे , डॉ . पंकज काळे, डॉ . अक्षय घवाळे तसेच ग्रामस्थ हजर होते .