भारतीय संविधान जागृती व मुलांचे भवितव्य हा प्रबोधन कार्यक्रम संपन्न
पेठ वडगांव, (प्रकाश कांबळे):-पेठ वडगांव ता हातकणंगले येथील दीपस्तंभ बुद्धविहार, सिद्धार्थनगर येथे भारतीय संविधान आणि मुलांचे भवितव्य याविषयावर मा.प्रकाश काशिळकर सर, सातारा यांचा प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बोलताना ते म्हणाले की लोकशाहीचे चारही स्तंभ लोकशाहीच्या शत्रूच्या ताब्यात गेले असून भारतीय संविधानातील मुलभूत अधिकारांची अंमल बजावणी करणे न करणे सर्वस्वी त्यांच्या ताब्यात आहे. बहुजनानी लोकशाहीच्या शत्रूला वेळेच ओळखून क्रेडरबेस प्रशिक्षण घेवूण लोकशाही मुल्यांचा प्रचार प्रसार करुन जागृती करण्याची गरज आहे.. मुलांनी मिळालेल्या संधीचा फायदा घेवून शिक्षणाला महत्व देणे गरजेचे आहे..अशा अनेक मुद्यावर सरांनी सरळ आणि साध्या भाषेत अनेक उदाहरणे देवून सद्याच वास्तव मांडले
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत चोपडे सर, वंदना विशाल धनवडे सर, ध्यान शितल कराडे सर यांनी तर आभार डाॅ.अमर पोवार यांनी मानले. सदर कार्यक्रमाला डाॅ.अमर पोवार सर, पंडित चोपडे सर, रणजित केळुसकर सर बी.एम.कांबळे सर, यशवंत चोपडे, पोवार साहेब, अशोक कांबळे, शितल कराडे, विशाल धनवडे, सचिन कांबळे,नरेंद्र कांबळे, नितीन कांबळे, पार्थ, उदय तसेच मुले मुली, महिला मोठ्यासंख्येने उपस्थित होते