Home कोल्हापूर जिल्हा बंडखोर सेना पक्षाच्या हातकणंगले तालुका उपाध्यक्षपदी राहुल देडे

बंडखोर सेना पक्षाच्या हातकणंगले तालुका उपाध्यक्षपदी राहुल देडे

Advertisements

बंडखोर सेना पक्षाच्या हातकणंगले तालुका उपाध्यक्षपदी राहुल देडे

Advertisements

 

 

वाठार, (प्रकाश कांबळे):-वाठार ता.हातकणंगले येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल शाहू देडे यांची बंडखोर सेना पक्षाच्या हातकणंगले तालुका उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली राहूल देडे वाठार गावातील सामाजिक कार्यात कायम सक्रिय असतात त्यांच्या या कामाची दाखल घेऊन बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी त्यांची निवड केली आहे

निवड होताच राहुल देडे म्हणाले की बंडखोर सेना पक्षाच्या माध्यमातून समाजातील लोकांना न्याय मिळवून देणार तसेच अन्याय अत्याचार विरोधात आवाज उठवणार प्रसंगी आंदोलन करून लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करणार आहे असे यावेळी राहूल देडे म्हणाले यावेळी प्रदेश अध्यक्ष डॉ.बी.डी.पाटील,महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा शिवालीताई आवळे,प्रदेश उपाध्यक्ष निलेश मोहिते,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दयानंद आवळे,युवक प्रदेश अध्यक्ष क्रांतिवीर वायदंडे,राज्य सल्लागार नागनाथ देसाई,पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सर्जेराव कार्वेकर,सांगली जिल्हा अध्यक्ष शशिकांत वायदंडे,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय लोखंडे,महिला आघाडी कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा मेघा कांबळे,महिला आघाडी सांगली जिल्हा अध्यक्षा संध्या सुतार,सांगली शहर अध्यक्ष विशाल मोहिते,हातकणंगले तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे,हातकणंगले तालुका युवक उपाध्यक्ष विनोद हेगडे,वाळवा तालुका कार्याध्यक्ष दादासो नांगरे,पलूस तालुका अध्यक्ष नारायण गाडे,सचिन कांबळे,आकाश अवघडे, अक्षय बल्लाळ,अभिषेक अवघडे,सोमनाथ पांडव, आणोश खुडे,सुशीला जाधव,अमोल जाधव उपस्थित होते.

Advertisements
Advertisements