फोटो : खोची बुवाचे वठार येथील नंदकिशोर बुवा यांची स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना मान्यवर
नंदकिशोर बुवा यांची स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ,पावस(रत्नागिरी) च्या विश्वस्त पदी निवड
खोची,(भक्ती गायकवाड):-बुवाचे वठार(ता.हातकणंगले) येथील नंदकिशोर जर्नादन बुवा यांची संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ,पावस (रत्नागिरी) च्या विश्वस्त पदी निवड झाली.या मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली.यामध्ये नंदकिशोर बुवा हे दुरंगी लढतीत जय देसाई यांच्या गटातून ३०४ अशा बहुमताने निवडून आले.
यानिमित्त त्यांचा बुवाचे वठार ग्रामस्थ व विविध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी वारणा दूध संघाचे संचालक चंद्रशेखर बुवा,माजी संचालक भीमराव शिंदे,उत्तम चौगुले,बाळासाहेब बावचे, बाळासाहेब खाडे,सुरेश चौगुले, मुस्सा पिंजारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास आत्माराम चौगुले, भगवान पाटील,मधुकर खाडे, शंकर अनुसे,रमेश शिंदे,संजय आडके,अशोक शिंदे,नागेश खाडे,डॉ.प्रदीप पवार,सुशांत शिंदे,कृष्णात माळी, राजकुमार कागवाडे,दिपक शिंदे,
विशाल पवार,संदीप शिंदे आदी उपस्थित होते.