Home कोल्हापूर जिल्हा निलेवाडी येथील बोरगे डि.पी.बनला मृत्यूचा सापळा , महावितरणचा बोंगळ कारभार

निलेवाडी येथील बोरगे डि.पी.बनला मृत्यूचा सापळा , महावितरणचा बोंगळ कारभार

Advertisements

निलेवाडी येथील बोरगे डि.पी.बनला मृत्यूचा सापळा ,महावितरणचा बोंगळ कारभार

Advertisements

 

 

नवे पारगाव : निलेवाडी तालुका हातकणंगले येथील वारणा नदी काठच्या बोरगे डी.पी. ची अवस्था अतिशय अतिशय वाईट झाली असून महावितरण चा बोंगळ कारभार पुन्हा एकदा जीवघेणा ठरत आहे. या डी पी वरून जवळ जवळ 25 मोटर ना विज कनेक्शन जाते . अनेक शेतकरी रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्याच्या उद्देशाने जात असतात त्यावेळी मोटर बंद झाली तर पर्यायाने डी पी जवळ जातात त्यावेळी या वायर ला हात लागून एकादा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही . महावितरण पारगाव च्या कर्मचाऱ्यांना वारंवार याबाबत सूचना देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलेला आहे या डीपीची व्यवस्था 2021 च्या पुरापासून आहे व फ्युज च्या जागी वायर

टाकून काम सुरू आहे. संभाव्य जीवित हानी ची शक्यता पाहता महावितरण ने वेळीच खबरदारी घेऊन या डीपीची दुरुस्ती करणे व फ्युज बसवणे गरजेचे आहे .
जर जर या फ्युज बसवल्या नाही तर शेतकऱ्यांना महावितरण च्या समोर आंदोलन करावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं शेतकऱ्यातून सांगितलं जात आहे तरी घटनेचा गांभीर्य ओळखून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून महावितरण या डीपीची दुरुस्ती करणे गरजेचे आहे
चौकट प्रतिक्रिया , राजेंद्र मोहिते : 2021 च्या पुरानंतर वारणा काठच्या या डीपीची अशी अवस्था झाली आहे वारंवार मागणी करूनही महावितरण याकडे कानाडोळा केला आहे भविष्यात एखादी जीवित हानी झाली तर याची जबाबदारी महावितरण घेणार आहे का , डीपी ची दुरुस्ती लवकरात लवकर झाली नाही तर महावितरण च्या समोर शेतकरी आंदोलन करतील.

Advertisements
Advertisements