घुणकी-चावरे , निलेवाडी रस्त्यावरील मोठमोठे खड्डयांची तात्पुरती मलमट्टी
नवे पारगाव : मुख्यमंत्री सडक योजनेतून सुमारे पाच कोटी खर्चून साकारलेल्या हातकणंगले तालुक्यातील घुणकी फाटा ते निलेवाडी दरम्यानच्या रस्त्याची मुदत संपल्यानंतर डागडुजी न झाल्याने रस्त्याची अवस्था खड्ड्यातील वाट अशी झाली दयनीय झाली आहे. जगन्नाथ शिंदे, अनिल राठोड यांनी खड्डे जेसीबीच्या सहाय्याने बुजविल्याने तात्पुरती का असेना या रस्त्यावर तात्पुरती मलमपट्टी झाल्याचे पहायला मिळत आहे.
पुणे-बंगळूर महामार्गावरील पुण्याहून वारणानगर, रत्नागिरीकडे जाणारी वाहने किणी येथील पथकर नाका चुकविण्यासाठी घुणकी- चावरे- तळसंदे या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावर वाहनांची रात्रंदिवस वर्दळ नेहमीचीच असते.
मुख्यमंत्री सडक योजनेतून २०१७ मध्ये घुणकी फाटा ते निलेवाडी दरम्यान आठ किलोमीटरचा रस्ता मंजूर होऊन कार्यकारी अभियंता, ग्रामीण रस्ते विकास कोल्हापूर यांच्या नियंत्रणाखाली यशोमाला कन्स्ट्रक्शन कोल्हापूर यांनी रस्त्याचे काम केले होते . सदर रस्त्यासाठी ५ कोटी ४ लाख २२ हजार रुपये खर्च झाला. हा रस्ता २०१८ मध्ये पूर्ण झाला. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराने पाच व देखभालीची मुदत २०१८ ते २०२३ पर्यंत होती.
ही मुदत संपल्यानंतर देखभाल बंद झाली आणि घुणकी ते चावरे निलेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. व रस्ता खराब होऊनही पथकर चुकविणारी महामार्गावरून जाणारी अनेक वाहने त्यातूनच जातात. दररोज प्रवास करणाऱ्यांना स्थानिकच्या वाहनधारकांसह नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. ऊस गळीत हंगाम सुरु असल्याने ट्रॅक्टर चालकांना ऊसाने भरलेल्या ट्राॅली घेऊन जाताना या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाले काढलेली नाहीत. नाल्यांमध्ये गवत वाढले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर उकिरडे झालं यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरुन पाणी वाहते. काही ठिकाणी रस्त्यावर व नाल्यावर अतिक्रमणे झाली असून ती काढण्याची गरज आहे. बाजूपट्टया खचल्याने अवजड वाहनांचेही व मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात झाले आहेत. हि रस्ता खडेमय झाल्याने येथील जगन्नाथ शिंदे व अनिल राठोड यांनी जेसीबीच्या सहाय्याने खड्डे बुजविण्याचे काम केले यामुळे खड्ड्यातील प्रवास थोडाफार सुखकर झाला आहे. मात्र
या मार्गांवरील वाहतुकीच्या वर्दळीचा विचार करता रस्त्याची रुंदी वाढवून भक्कम रस्ता करण्याची मागणी होत आहे दरम्यान .हा रस्ता सार्वजनिक बांधकामकडे या रस्त्यावरील वाहतुकीचा विचार करुन खासदार धैर्यशील माने, आमदार डाॅ. विनय कोरे यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. हा मात्र हा रस्ता अजूनही सार्वजनिककडे वर्ग झालेला नाही. त्यामुळे रस्त्याची ही अवस्था झाली आहे