पत्रकार हा समाज परिवर्तनाचा महत्वाचा घटक- आम‌दार अशोकराव माने

    Advertisements

    पत्रकार हा समाज परिवर्तनाचा महत्वाचा घटक- आम‌दार अशोकराव माने

    Advertisements

     

     

    पेठवडगाव : पत्रकार हा समाज परिवर्तनाचा महत्वाचा घटक असुन लेखनिच्या माध्यमातुन पत्रकारांनी समाज समृध्द करण्यावर भर द्यावा असे मत आम . अशोकराव माने यांनी व्यक्त केले ते हातकणंगले येथील तहसिलदार कार्यालय सभागृह येथे आयोजित आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती व पत्रकार दिना निमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाची सुरवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली .

    यावेळी पुढे बोलताना आम.माने म्हणाले हातकणंगले येथील पत्रकार भवनास सर्वोतोपरी सहकार्य करणार असुन , अधिस्विकृत पत्रकार घेण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगीतले . या प्रसंगी तहसिलदार सुशिलकुमार बेल्हेकर , अरूण इंगवले , जेष्ट पत्रकार दत्ता बिडकर , महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये यांनी मनोगत व्यक़्त केले . यावेळी तहसिलदार कार्यालय अवारात पत्रकार कक्षाचे उद्घाटन ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .

    कार्यक्रमास गटविकास अधिकारी शबाना मोकाशी , उपनिबंधक सदाशिव जाधव , दिलीपकुमार काळे , उप अभियंता शिवाजी पाटील , गटशिक्षण अधिकारी रविंद्र चौगुले , कृषी अधिकारी अभिजीत गडदे ,दलित महासंघाचे मार्तंड वाघमारे,धनाजी,करवते ,पत्रकार अतुल मंडपे , रमेश बोभाटे , सुकुमार अब्दागिरे, राजु मुजावर , विनोद शिंगे ,आनंदा काशीद, राहुल रत्नपारखे , राजु शिंदे , भगवान पोळ ,संदिप कांबळे , राजकुमार चौगुले , शिवाजी वाघरे , बाबूराव जाधव , योगेश पांडव यांच्यासह हातकणंगले तालुक्यातील पत्रकार मोठया संख्येने उपस्तीत होते . स्वागत पापालाल सनदी यांनी तर सुत्रसंचलन रोहन साजणे यांनी केले .

    Advertisements
    Advertisements