मिणचे येथे जनस्वास्थ्य सप्ताह उत्साहात साजरा

    Advertisements

     

    मिणचे येथे जनस्वास्थ्य सप्ताह उत्साहात साजरा

    Advertisements

     

     

    पेठ वडगांव,(प्रतिनिधी):- उत्तम आरोग्य हे प्रगतीचे लक्षण आहे.रोग होण्या अगोदर त्याची खबरदारी व दक्षता घेतल्यास कोणताही आजार आपल्या जवळ येत नाही असे प्रतिपादन मिणचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.प्रणव कांबळे यांनी केले.जनस्वास्थ्य सप्ताहानिमित्त आयोजित राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत कुष्ठरोग व क्षयरोग यावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी.डी.कुंभार होते.

    यावळी डॉ कांबळे यांनी डेंग्यू व इतर संसर्गजन्य आजारांपासून स्वताचे कसे संरक्षण करावे याबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकाचे समाधान केले.  तसेच आरोग्य सेविका एस एस वाघमोडे यांनी किशोरवयीन लैंगिक समस्या,घ्यावयाची दक्षता या विषयावर विदयार्थींनींना मार्गदर्शन केले.यावेळी एस एस देशमुख,सौ.व्ही एस जाधव,ए ए कुंभार,ए एच सुर्यवंशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक मयूर मोरे, परिचारिका एस ए जमखंडीकर,सर्व आशा सेविका इत्यादी उपस्थित होते.आभार डी.डी.जाधव यांनी मानले.

    माध्यमिक शिक्षण विभाग कोल्हापूर यांचे आदेशानुसार शाळेत एक ते सहा जानेवारी जनस्वास्थ्य सप्ताह साजरा करण्यात आला.यामध्ये दररोज सकाळी जनस्वास्थ्य प्रतिज्ञा, क्षयरोग, कुष्ठरोग निर्मूलन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती,कच-यापासून खत निर्मिती,घराच्या टेरेसवर व कमी जागेत भाजीपाला उत्पादन घेणे, सौरऊर्जा वापर, गुटखा, तंबाखू, धुम्रपान विरोधी मानवी साखळी इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.

    Advertisements
    Advertisements