डॉ.ऐश्वर्या पवार यांच्या संशोधन प्रकल्पास अनुदान मंजूर
पेठ वडगाव : येथील श्री विजयसिंह यादव महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या प्रा.डॉ.ऐश्वर्या सचिन पवार यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे कडून “ फॅारमूलेशन ऑफ नोवेल वर्मीकंपोस्ट वेर्मिवाश फ्रॉम देशी काऊ (गिर) डंग अँन्ड युरीन एक्स्ट्राकट फॉर अग्रीकल्चर अँप्लीकेशनस ” या संशोधन प्रकल्पास डायमंड जुबली रिसर्च इनिशिएशन या योजने अंतर्गत अनुदान प्राप्त झाले. डॉ ऐश्वर्या पवार यांच्या संशोधनाचा शेतकरी वर्गास फायदा होणार आहे. त्यांना हा संशोधन प्रकल्प मंजूर झाल्याबद्दल संस्था अध्यक्ष गुलाबराव पोळ, उपाध्यक्ष श्रीमती विजयादेवी यादव, सचिव विद्या पोळ संचालक राजकुमार पोळ व प्राचार्य डॉ अशोक चव्हाण यांनी अभिनंदन केले. डॉ आर. एस. डुबल, डॉ आर.एम. गेजगे व डॉ जितेश दौंडे यांचे मार्गदशन व प्रोत्साहन लाभले.