Home कोल्हापूर जिल्हा वाठार येथे दलित महासंघाच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निदर्शने

वाठार येथे दलित महासंघाच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निदर्शने

Advertisements

वाठार येथे दलित महासंघाच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निदर्शने

Advertisements

 

वाठार,(प्रकाश कांबळे):-वाठार ता.हातकणंगले येथे दलित महासंघाच्या वतीने संसद भवन मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमानकारक शब्दाचा वापर केलेबाबत तसेच भारत देशामध्ये महिलांचेवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली, यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दानाणून सोडला.

यावेळी वाठार येथील एस टी स्टॅन्ड चौकात अमित शहा यांना गृहमंत्री पदावरून हटवण्यात यावे तसेच देशामध्ये महिलांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार, बलात्कार या घटनेच्या विरोधात दलित महासंघाचे कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात जाहीर निषेध केला तसेच परभणी येथील दलित कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू हा वेदनादायी असून याघटनेची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून बडतर्फ करणेत यावे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली निदर्शनावेळी वडगांव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यानी बंदोबस्त ठेवला होता यावेळी मोर्चाचे निवेदन स पो नी सलगर यांना देण्यात आले यावेळी दलित महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष धनाजी सकटे, जिल्हाउपाध्यक्ष महावीर सर्वगोड, संघटक भाऊसो आवळे, हातकणंगले तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर अवघडे, संदीप कांबळे, प्रकाश कांबळे, धनाजी परीट, जावेद कुरणे, शरद कांबळे, स्वप्नील शिंदे, राहूल क्षीरसागर, किशोर कांबळे, धनराज जाधव, प्रेम अवघडे, नयन दबडे, बाबासो दबडे, प्रविण वाघमारे, विनोद सातपुते, राकेश लोखंडे, सिद्धार्थ ढाले, बबलू बल्लाळ, गणेश दबडे पवन दबडे,अजय पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements
Advertisements